2025 मध्ये भारतात लॉन्च होणार नवीन इलेक्ट्रिक कार्स,या कंपन्या लॉन्च करू शकतात त्यांच्या इलेक्ट्रिक कार्स
2025 मध्ये भारतात लॉन्च होणार नवीन इलेक्ट्रिक cars,या कंपन्या लॉन्च करू शकतात त्यांच्या इलेक्ट्रिक cars,E CARS LAUNCHING IN INDIA 2025.
भारतात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या दिवसें दिवस वाढत आहे अनेक लोक इलेक्ट्रिक वाहन घेण्यास पसंती देत आहेत टू व्हीलर पासून ते फोर व्हीलर पर्यंत इलेक्ट्रिक वाहनांची चांगलीच चर्चा आहे 2025 मध्ये सुद्धा काही नामांकित कंपन्या त्यांची इलेक्ट्रिक वाहने भारतामध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत यात प्रामुख्याने E CARS समावेश आहे.
MARUTI SUZUKI E VITARA
मारुती सुझुकी ही भारतातील प्रवासी वाहनांची उत्पादन करणारी सर्वात मोठी कंपनी आहे ही कंपनी त्यांची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही कार इ विटारा 2025 मध्ये भारतात लॉन्च करणार आहे ही कार मार्चमध्ये लॉन्च होऊ शकते.
HYUNDAI CRETA ELECTRIC
ह्युंदाई ही दक्षिण कोरियाची ऑटोमोटिव्ह उत्पादन करणारी कंपनी आहे भारतात या कंपनीला लोकांकडून खूप पसंती दिली जाते मोठ्या प्रमाणावर ह्युंदाई च्या cars भारतात वापरल्या जातात ह्युंदाई आता त्यांची लोकप्रिय असलेली HYUNDAI CRETA ची इलेक्ट्रिक व्हेईकल भारतात लॉन्च करणार आहे साधारणतः ही कार 2025 च्या सुरुवातीला लॉन्च होऊ शकते.
महिंद्रा भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे महिंद्रा आता त्यांची XUV700 या कारची इलेक्ट्रिक व्हर्जन असलेली महिंद्रा XUV e8 ही कार भारतात लॉन्च करणार आहे यामुळे भारतीय बनावटीची E CAR लोकांना उपलब्ध होऊ शकेल.
टाटा मोटर्स ही एक भारतीय मल्टिनॅशनल ऑटोमोटिव्ह कंपनी आहे सध्याला भारतात कार खरेदीमध्ये टाटा कंपनीला मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते टाटा मोटर्सची टाटा हॅरियर ही एक एसयुव्ही कार आहे तिची इलेक्ट्रिक व्हर्जन असलेली TATA HARRIER EV ही मार्च 2025 मध्ये लॉन्च होऊ शकते.
SKODA ENYAQ IV
VOLKSWAGEN च्या मालकीची असलेली स्कोडा कंपनी सुद्धा भारतात त्यांची SKODA ENYAQ IV ही कार लॉन्च करू शकते ही कार साधारणतः 2025 च्या सुरुवातीला लॉन्च होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे 2025 मध्ये मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहने भारतीय बाजारात येऊ शकतात.
नवीन वर्षात भारतीय बाजारात धमाकेदार स्मार्टफोन्सची एन्ट्री,SAMSUNG, OPPO, ONE PLUS, XIAOMI आणि POCO लॉन्च करणार नवीन स्मार्टफोन्स,NEW SMARTPHONES IN INDIA 2025
नवीन वर्षात भारतीय बाजारात धमाकेदार स्मार्टफोन्सची एन्ट्री,SAMSUNG, OPPO, ONE PLUS, XIAOMI आणि POCO लॉन्च करणार नवीन स्मार्टफोन्स,NEW SMARTPHONES IN INDIA 2025
Comments
Post a Comment