IOCL मध्ये अधिकारी बनण्याची सुवर्णसंधी, वर्षाला ₹17.7 लाखांपर्यंतचे पॅकेज, अर्ज करण्याची अंतिम मुदत याच महिन्यात संपत आहे:
IOCL Jobs 2025: इंडियन ऑइलमध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे. इंजिनिअर्स आणि ऑफिसर पदांसाठी भरती सुरू आहे.
IOCL भरती २०२५: नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी इंडियन ऑइलमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. येथे इंजिनिअर्स आणि ऑफिसर पदांसाठी पात्र लोकांची आवश्यकता आहे. कंपनीने भरतीचे सविस्तर नोटिफिकेशन जारी केले आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया ५ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. त्यामुळे या भरतीमध्ये भाग घेण्यास इच्छुक असलेले उमेदवार २१ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत iocl.com या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात. त्यानंतर फॉर्म लिंक बंद होईल. त्यामुळे वेळेत अर्ज करा.
तपशील | माहिती |
---|---|
भरती संस्था | इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) |
पदाचे नाव | अभियंता / अधिकारी (Engineers / Officers) |
एकूण पदसंख्या | जाहीर नाही |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 5 सप्टेंबर 2025 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 21 सप्टेंबर 2025 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत |
शैक्षणिक पात्रता | संबंधित विषयात BE / B.Tech पदवी |
वयोमर्यादा | कमाल 26 वर्षे |
CBT परीक्षा दिनांक | 31 ऑक्टोबर 2025 |
प्रवेशपत्र (Admit Card) उपलब्ध होण्याची तारीख | 17 ऑक्टोबर 2025 |
निवड प्रक्रिया | CBT परीक्षा → गट चर्चा (GD) / गट कार्य (GT) → वैयक्तिक मुलाखत (PI) |
पगार श्रेणी | ₹50,000 – ₹1,60,000 (वार्षिक पॅकेज अंदाजे ₹17.7 लाख) |
अधिकृत अधिसूचना | इथे क्लिक करा (PDF) |
ऑनलाईन अर्ज लिंक | इथे अर्ज करा |
पात्रता काय असावी?
इंडियन ऑइलच्या या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.टेक/बी.ई किंवा समकक्ष पदवी किमान 65% गुणांसह असणे आवश्यक आहे.आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST/PwBD) किमान 55% गुणांची अट लागू राहील.या भरतीद्वारे केमिकल, इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी विभागांमध्ये उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
वयमर्यादा:
सामान्य / ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांचे वय जास्तीत जास्त 26 वर्षांपेक्षा अधिक नसावे. वयाची गणना 1 जुलै 2025 रोजीच्या स्थितीनुसार करण्यात येईल. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमांनुसार वरच्या वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
अर्ज कसा करावा?
- अर्ज प्रक्रिया सुरू करण्यासाठी उमेदवारांनी इंडियन ऑइलची अधिकृत वेबसाइट iocl.com येथे भेट द्यावी.
- येथे Latest Job Opening विभागात जा.
- Recruitment Of Engineers/Officers (Grade-A) in Indian Oil Corporation Limited through Computer Based Test (CBT-2025) या सूचनेखाली दिलेल्या Click Here to Apply या लिंकवर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्ही IBPS च्या वेबसाइटवर रीडायरेक्ट व्हाल. याच ठिकाणी अर्ज भरायची प्रक्रिया सुरू होईल.
- प्रथम नोंदणी (Registration) पूर्ण करा.
- आता मिळालेल्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे Login करून आपली मूलभूत माहिती भरा.
- फोटो व स्वाक्षरी योग्य आकारात अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरल्यानंतर, फॉर्म Final Submit करण्यापूर्वी Preview नीट तपासा.
- अर्जाचा प्रिंट आउट काढून भविष्यासाठी जतन करून ठेवा.
या भरतीसंबंधी अधिक माहितीसाठी उमेदवारांनी इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

Comments
Post a Comment